पुणे : ‘मिशन इंद्रधनुष्यमध्ये सहभागी व्हा’; खासगी डॉक्टरांना आवाहन | पुढारी

पुणे : ‘मिशन इंद्रधनुष्यमध्ये सहभागी व्हा’; खासगी डॉक्टरांना आवाहन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेतर्फे ऑगस्टपासून मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेची पहिली फेरी 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मोहिमेत सहभागी होण्यासाठी महापालिकेकडून खासगी वैद्यकीय व्यावसायिक, धर्मगुरू, सामाजिक संस्था यांना आवाहन करण्यात आले आहे. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांचे तसेच गर्भवती मातांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

मोहिमेची तयारी करण्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली 31 जुलै रोजी सिटी टास्क फोर्सची बैठक घेण्यात आली. शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग, सामाजिक विकास विभाग, राव एम. टी. परिवहन मंडळ यांना सहभागी करण्याचे आदेश देण्यात आले. जनजागृती करण्यासाठी शाळांमार्फत प्रभातफेरी, पथनाट्याचे नियोजन करण्यात आले. आपल्या घरातील अथवा आपल्या शेजारील सर्व बालकांचे व गर्भवती मातांचे पूर्ण लसीकरण करून घ्यावे,
असे आवाहन विक्रम कुमार यांनी केले आहे.

मोहिमेच्या फेर्‍या पुढीलप्रमाणे
पहिली फेरी : 7 ते 10 ऑगस्ट
दुसरी फेरी : 11 ते 16 सप्टेंबर
तिसरी फेरी : 9 ते 14 ऑक्टोबर

मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेत नव्याने बालकांचे लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन पोर्टल बनविण्यात आले आहे. पोर्टलद्वारे लसीकरण सत्रांचे दिनांक, वेळ, ठिकाणे याची सर्व माहिती तसेच ऑनलाइन रजिस्ट्रेशन नागरिकांना घरबसल्या करता येणार आहे.

रवींद्र बिनवडे,
अतिरिक्त महापालिका आयुक्त

हेही वाचा

छत्रपती संभाजीनगर : मणिपूर घटनेतील दोषींना शिक्षा देण्यासाठी महिलेचे अन्नत्याग आंदोलन

रत्नागिरी : कोकण किनारपट्टी भागात उघडीप

नाशिक : चार तासांच्या थरारानंतर तडीपार गुंडाला अटक

Back to top button