छत्रपती संभाजीनगर : मणिपूर घटनेतील दोषींना शिक्षा देण्यासाठी महिलेचे अन्नत्याग आंदोलन | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : मणिपूर घटनेतील दोषींना शिक्षा देण्यासाठी महिलेचे अन्नत्याग आंदोलन

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: मणिपूर हिंसाचारातील दोषींना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी माजी सैनिकाच्या एका मुलीने क्रांती चौकात आजपासून (दि.३१) अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. दिपाली श्यामराव कोलते असे या महिलेचे नाव आहे. ही महिला छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे.

आज दुपारी साडेतीन वाजल्यापासून दिपाली कोलते यांनी आंदोलनाला सुरूवात केली आहे. त्यांचे वडील माजी सैनिक आहेत. देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्यामुळे हे आंदोलन करीत असल्याचे दिपाली कोलते यांनी सांगितले. देशात पुरूष प्रधान संस्कृती आहे. मणिपूर प्रकरण त्याचेच एक उदाहरण आहे. अशा प्रवृत्तींना नेस्तनाबूत केले पाहिजे, असे मत व्यक्त करून त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. या प्रकरणातील दोषींना शिक्षा होत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरू राहणार असल्याचे दिपाली यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button