पुणे : पालिकेचे सर्व्हर डाऊन; सवलतीमध्ये कर भरण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ | पुढारी

पुणे : पालिकेचे सर्व्हर डाऊन; सवलतीमध्ये कर भरण्यासाठी दोन दिवसांची मुदतवाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या मिळकतकर विभागाचा सर्व्हर डाऊन झाल्याने सवलतीमध्ये मिळकतकर भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी नागरिकांची गैरसोय झाली. त्यामुळे नागरिकांनी करभरणा केंद्रांवर मोठी गर्दी केली होती. परिणामी, नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी महापालिकेने मिळकतकर भरण्याची मुदत दोन दिवस वाढवून 2 ऑगस्ट केली आहे. महापालिकेतर्फे आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत मिळकतकर भरणार्‍यांना सर्वसाधारण मिळकतकरात 5 ते 10 टक्के सूट दिली जाते.

यंदा 40 टक्के सवलतीच्या विलंबामुळे महापालिकेने करातील सवलतीसाठी 15 मे ते 31 जुलै हा कालावधी ठेवला होता.
गेल्या अडीच महिन्यांत महापालिकेला सुमारे अकराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. या सवलतीचा सोमवारी शेवटचा दिवस होता. संकेतस्थळ बंद असल्याने नागरिकांनी कर भरण्यासाठी नागरिक सुविधा केंद्र गाठले. त्यामुळे केंद्रांवर मोठी गर्दी झाली. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्याने येथील यंत्रणाही बंद पडली. त्याचा फटका नागरिकांना बसला.

काही तांत्रिक कारणांमुळे मिळकतकराचा भरणा काही कालावधीसाठी बंद झाला होता. त्यामुळे मिळकतकर सवलतीमध्ये भरण्याची मुदत 2 ऑगस्ट रोजी रात्री 12 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच लॉटरी योजनेचा कालावधीदेखील
2 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे.

– अजित देशमुख, उपायुक्त, मिळकतकर विभाग, महापालिका

हेही वाचा

कर्नाटकातील मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस नेते उद्या दिल्लीला

छत्रपती संभाजीनगर : मणिपूर घटनेतील दोषींना शिक्षा देण्यासाठी महिलेचे अन्नत्याग आंदोलन

गेल्या 9 वर्षांत अतिवृष्टीचे देशात 17 हजार बळी

Back to top button