

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या सर्वच भागांत गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेला पाऊस पुढील किमान पाच ते सात दिवस सुरूच राहणार आहे. दरम्यान, कोकणात सोसाट्याचा वारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटात काही भागांत अतिमुसळधार, तर तुरळक भागात मुसळधार आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवसांसाठी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, घाटमाथा, चंद्रपूर, गडचिरोली या भागांत रेड अलर्ट दिला आहे. राज्यात मान्सून सक्रिय असून, सध्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कायम आहे.
हा पट्टा ईशान्य बंगालच्या उपसागरापासून ते आंध्र प्रदेश दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीपर्यंत सक्रिय असून, हळूहळू उत्तर आंध्र प्रदेश ते दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेशावर चक्रीय स्थिती असल्यामुळे विदर्भात मुसळधार पाऊस कायम राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनचा ट्रफ सरासरीच्या जवळ आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर राहणार आहेच. त्यातही कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा, विदर्भाच्या काही भागांत अतिमुसळधार पाऊस राहणार आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार राहणार आहे.
असे आहेत अलर्ट
ऑरेंज : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, यवतमाळ. रेड : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, संभाजीनगर, चंद्रपूर, गडचिरोली. यलो : जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम.
हेही वाचा :