डोळे येण्याची साथ, ‘अशी’ घ्या काळजी

डोळे येण्याची साथ, ‘अशी’ घ्या काळजी

पुणे : डोळ्यांचा विषाणुजन्य संसर्ग होण्याच्या (डोळे येणे) प्रकारात वाढ झाली असून, काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे. याशिवाय उपाययोजना करण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील आळंदी भागात तसेच शिरूर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे डोळे आलेले रुग्ण आढळले आहेत. अजूनही अनेक रुग्ण आढळून येत आहेत. अनेक भागांत उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात डोळे येण्याची विषाणुजन्य साथ सुरू झाली आहे. डोळ्यांचा विषाणुजन्य संसर्ग हा मुख्यत्वे अ‍ॅडिनो व्हायरसमुळे होतो. डोळ्यांचा विषाणुजन्य संसर्ग हा सौम्य प्रकारचा संसर्ग असला, तरीदेखील याबाबत आरोग्य विभागाने आणि नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या नव्या सीईओंचे आवाहन

ही घ्या काळजी

डोळे स्वच्छ पाण्याने सतत धुवावे.
चष्म्याचा वापर करावा.
डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध डोळ्यांत टाकावे.
कचर्यावर माश्या बसतात आणि त्या डोळ्यांची साथ पसरवतात, म्हणून परिसर स्वच्छ ठेवावा.
या उपाययोजना त्वरित करा
वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांनी आपल्या भागात आरोग्यसेवक, सेविका, आशावर्करच्या मदतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे.
शाळा, अंगणवाडी, हायस्कूल, वसतिगृहांना भेटी देऊन मुलांची तपासणी करावी.
ज्या भागात पावसामुळे चिकचिक, चिलटांचा प्रादुर्भाव असेल अशा भागांतील परिसर स्वच्छ करावा आणि आवश्यक त्या उपाययोजना ग्रामपंचायतींनी कराव्यात.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news