पुणे मेट्रोची दुसर्‍या टप्प्यातील स्थानके तयार | पुढारी

पुणे मेट्रोची दुसर्‍या टप्प्यातील स्थानके तयार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्यातील स्थानकांची कामे आता पूर्ण झाली असून, ती प्रवासी सेवेसाठी सज्ज झाली आहेत. मेट्रो प्रशासनाकडून नुकतेच या स्थानकावर नावांचे फलक बसवण्यात आले आहेत. येथून ये-जा करणारे नागरिकही आवर्जून या फलकांकडे उभे राहून पाहात असून, त्यांच्यामध्ये उत्सुकता दिसून येत आहे.

महा मेट्रोचे पुण्यातील दुसर्‍या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, मेट्रो या टप्प्याच्या उद्घाटनासाठी आता सज्ज झाली आहे. मेट्रोने दुसर्‍या टप्प्यातील सिव्हील कोर्ट, मंगळवार पेठ (आरटीओ), पुणे रेल्वे स्टेशन, रुबी हॉल स्थानकांना नामफलक बसविले आहेत. मेट्रोच्या पहिला टप्प्याचे वनाज ते गरवारे कॉलेज आणि पीसीएमसी ते फुगेवाडीपर्यंतचे काम पूर्ण झाले. त्या टप्प्यामध्ये मार्गावर मेट्रो ट्रेन धावत असून, आता प्रवासी सेवादेखील पुरविली जात आहे. पुणेकर प्रवाशांचा या मार्गांवर चांगला प्रतिसाद मिळत असून, मेट्रो आता दुसरा टप्पा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

मेट्रोचा दुसरा टप्पा असलेल्या गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मेट्रो स्थानक आणि फुगेवाडी ते शिवाजीनगर भुयारी मेट्रो स्थानकापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. हा टप्पा सुरू करण्यासाठी मेट्रोकडून युध्दपातळीवर तयारी करण्यात येत आहे. स्थानकातील अंतर्गत कामे पूर्ण झाली असून, आता मेट्रोने स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील फलकदेखील बसविले आहेत.

हेही वाचा

सातारा : कोयनेत 24 तासांत 5.18 टीएमसी पाण्याची आवक

सातारा : कोयनेत 24 तासांत 5.18 टीएमसी पाण्याची आवक

भीमाशंकरला 2 लाख भाविक; अधिक श्रावणच्या पहिल्याच सोमवारी पवित्रलिंगाचे घेतले दर्शन

Back to top button