भीमाशंकरमध्ये हुल्लडबाज, मद्यपी तरुणांवर कारवाई | पुढारी

भीमाशंकरमध्ये हुल्लडबाज, मद्यपी तरुणांवर कारवाई

भीमाशंकर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात हुल्लडबाजी व मद्य प्राशन करणार्‍या तरुणांवर तसेच नियम मोडून वाहन चालविणार्‍यांवर घोडेगाव पोलिसांनी कडक कारवाई केली. एक दिवसाच्या कारवाईत एकूण 60 हजार रुपयांचा दंड संबंधितांकडून वसूल करण्यात आला. श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पावसाळी पर्यटनासाठी येणार्‍या हुल्लडबाज तसेच मद्यपी तरुणांमुळे या परिसराची शांतता भंग होऊ नये तसेच भाविकांना त्रास होऊ नये म्हणून घोडेगाव पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, निखिल मगदुम, सहायक फौजदार हरिभाऊ नलावडे, बाळासाहेब सुरकुले, माणिकराव मुळूक, रणजित सांगडे, स्वप्नील कानडे आदी पोलिस कर्मचार्‍यांनी तळेघर येथे नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली. या वेळी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी 113 जणांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून एकूण 60 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच दारू पिऊन वाहन चालवणार्‍या दोन जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

हेही वाचा

पुणे : देशभरातील संस्थेच्या जागा पदाधिकार्‍यांच्या ताब्यातच!

पुणे : कुतूहलाने ’वंदेभारत’मध्ये चढला अन् दरवाजे झाले लॉक

पुण्यात दिवसभर रिमझिम, रात्री संततधार

Back to top button