पुणे : ’समान पाणीपुरवठा’चे 60 टक्के काम पूर्ण

पुणे : ’समान पाणीपुरवठा’चे 60 टक्के काम पूर्ण

पुणे : शहरातील नागरिकांना समान दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी आणि सध्या होणारी 40 टक्के पाणीगळती थांबविण्यासाठी महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना हाती घेतली आहे. ही योजना पुढील 30 वर्षांची संभाव्य 49 लाख 21 हजार 663 लोकसंख्या विचारात घेऊन आखण्यात आली आहे. या योजनेसाठी अंदाजे 2 हजार 818 कोटी 46 लाख रुपये खर्च येणार आहे. या योजनेसाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे.

योजनेंतर्गत शहरात विविध 82 पाणी साठवण टाक्या, 1550 किमी लांबीच्या लहान-मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या, 120 किमी लांबीच्या पाणी साठवण टाक्यांना पाणीपुरवठा करणार्‍या जलवाहिन्या आणि 3 लाख 18 हजार 847 पाणी मीटर बसवणे, नवीन पाच पंपिंग स्टेशन बांधणे आदी कामे केली जाणार आहेत. योजनेच्या कामाचे विभाजन पर्वती, भामा आसखेड, वारजे, लष्कर, वडगाव, मुख्य वितरण नलिका अशा 6 पॅकेजमध्ये करण्यात येत आहे. हे काम दोन ठेकेदार कंपन्यांना देण्यात आले आहे.

मात्र, या योजनेच्या प्रवासात सुरुवातीपासूनच कोणत्या ना कोणत्या प्रकारचे विघ्न येत आहे. निविदा प्रक्रिया, मीटर खरेदी, मीटर बसविण्यास होणारा विरोध, पाण्याच्या टाक्या, भूसंपादन अशा अनेक कारणांनी ही योजना कायमच चर्चेत राहिली आहे. या सर्व कारणांमुळे योजनेचे काम अपेक्षित गतीपेक्षा निम्म्या गतीनेही होत नसून, आतापर्यंत 60 टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

पाणी साठवण टाक्या
एकूण टाक्या – 82
काम पूर्ण – 44
काम सुरू – 20
वर्क ऑर्डर
दिल्या – 4
निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात – 10
जागा ताब्यात नसल्याने अद्याप कामे सुरूच नाहीत – 4

जलवाहिन्या टाकणे

वितरण जलवाहिन्या
एकूण काम – 1550 किमी
काम पूर्ण – 836.42 किमी

टाक्यांना पाणीपुरवठा करणार्‍या वाहिन्या

एकूण काम – 120 किमी
काम पूर्ण – 74 किमी.

पाणी मीटर बसविणे :
एकूण मीटर –
3 लाख 18 हजार 847
काम पूर्ण – 1 लाख
27 हजार

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news