Scholarship Exam Result: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; शिष्यवृत्तीसाठी यंदा 31 हजार 786 विद्यार्थी पात्र

इयत्ता पाचवी शिष्यवृत्तीचा निकाल 23.90 टक्के, तर आठवीचा 19.30 टक्के
Scholarship Exam Result
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकालFile Photo
Published on
Updated on

पुणे : राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी दि. 9 जुलैला जाहीर झाला. पाचवी व आठवीचा एकूण निकाल 22.06 टक्के लागला आहे. निकालासोबत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. यंदा पाचवी व आठवीच्या एकूण 31 हजार 786 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे..

राज्य परीक्षा परिषदेमार्फत बुधवार दि. 9 फेब—ुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (इ. 8 वी) अंतिम निकाल, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या परिषदेच्या वेबसाईटवर पाहता येणार आहेत.

Scholarship Exam Result
Pune Dams: पुणे जिल्ह्यातील धरणे 74 टक्के भरली; गेल्या वर्षापेक्षा पाचपट पाणीसाठा

यंदा पाचवी शिष्यवृत्तीचा निकाल 23.90 टक्के, तर आठवीचा 19.38 टक्के लागला आहे. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यभरातून 5 लाख 47 हजार 504 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1 लाख 38 हजार 846 विद्यार्थी पात्र ठरले. त्यातील 16 हजार 693 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार आहे. त्याचप्रमाणे इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 3 लाख 65 हजार 754 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 70 हजार 571 विद्यार्थी पात्र ठरले. यातील 15 हजार 93 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिले जाणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news