साताऱ्यातील कास पठारावरील तलावाच्या गाळाने उलगडले सुमारे 8664 वर्षापूर्वीचे हवामान बदलांचे रहस्य | पुढारी

साताऱ्यातील कास पठारावरील तलावाच्या गाळाने उलगडले सुमारे 8664 वर्षापूर्वीचे हवामान बदलांचे रहस्य

अक्षय मंडलिक

पुणे : सातारा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेले कास पठार येथील तलावातील गाळाच्या नव्या अभ्यासानंतर आजपासून सुमारे 8664 वर्षांपूर्वी भारतातील उन्हाळी पावसाच्या पद्धतीत महत्वाचे बदल झाले आहेत. या पठार भागात कमी पाऊस झाल्यामुळे कोरडे हवामान कसे निर्माण झाले याचा अंदाज बांधणे शक्य झाले. या तलावातील गाळ सुमारे 8000 वर्षांपूर्वीचा आहे.

त्या तलावातील गाळातून सुमारे 2827 हा प्रदेश कमी आणि कमकूवत मोसमी पावसाचा प्रदेश बनल्याचे सिद्ध झाले आहे. यूनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या पश्चिम घाटाचा भाग असलेले कास पठार हे तिथे आढळणाऱ्या कासा वृक्ष या नावाने ओळखले जाते. विपुल जैवविविधता असलेल्या कास पठारावर ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात विविध रंगाची हंगामी रानफुले चांगलीच फुललेले दिसतात.

संबंधित बातम्या

पुण्यातील आघारकर संशोधन संस्था (ARI), विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची स्वायत्त संस्था आणि नॅशनल सेंटर फॉर अर्थ सायन्सेस, तिरुवनंतपुरम यांनी कास पठारावरील भूतकाळातील हवामान समजून घेण्यासाठी या गाळाचा अभ्यास केला आहे. कार्बन डेटिंग नुसार 8000 वर्षांपूर्वीच्या या मातीवरुन पूर्वीच्या हवामानाच्या परिस्थितीचा अंदाज बांधता आला.

त्यावरून 8000 वर्षांपूर्वी या तलावात मोसमी पाऊस पडत असून साधारण 2000 वर्षांपूर्वी हा तलाव कोरडा झाला असावा असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. तसेच हा मोसमी तलाव हे भूवचाची झीज होऊन तिथे तयार झालेल्या मोठ्या खड्डयामुळे विकसित झाला असावा, असेही या निरीक्षणात सांगतात.

सुमारे 2,827 वर्षांपूर्वी पावसात घट आणि नैऋत्य मोसमी पावसाचे प्रमाण कमी झाल्याचे निरीक्षणात दिसून आले. मात्र, गेल्या 1000 वर्षांच्या काळात या तलावात मोठ्या संख्येने आढळलेले परागकण, प्लँकटोनिक आणि प्रदूषण-सहिष्णु डायटॉम टॅक्स यामुळे ह्या तलावाचे युट्रोफिकेशन झाले. तलावात नायट्रोजनसारखी पोषणमूल्ये वाढल्याचे सूचित झाले आहे. पाणलोट क्षेत्रातील गुरांचा वावर आणि मानवी प्रभावामुळे हा बदल झाला असल्याची शक्यता आहे.

हे ही वाचा

चासकमान धरणात ५० टक्के पाणीसाठा; उपविभागीय अधिकारी डी. एस. डिगिकर यांची माहिती

Nashik : कळवण तालुक्यात भात लावणीची लगबग सूरू

हिंगोली : गोरेगाव परिसरात नदी ओढ्याला पूर

Back to top button