वंचित बालकांसाठी ‘मिशन इंद्रधनुष्य’; लसीकरणासाठी उपक्रम | पुढारी

वंचित बालकांसाठी ‘मिशन इंद्रधनुष्य’; लसीकरणासाठी उपक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांपर्यंत पोहचून लसीकरण करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ‘मिशन इंद्रधनुष्य’ राबविले जाणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपक्रमाला सुरुवात होईल. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. कोरोना महामारी, कामासाठी होणारे स्थलांतर, अशा विविध कारणांमुळे लहान मुले नियमित लसीकरणापासून वंचित राहिली आहेत. गर्भवती महिलांचेही लसीकरण मागे पडले आहे. अशा परिस्थितीत गरीब, कामगार कुटुंबासाठी त्यांच्या जागेवर जाऊन बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

कोरोना काळात जन्मलेल्या बालकांचे नियमित लसीकरणही मागे पडले आहे. त्यांच्यासाठी पुढील तीन महिने ‘विशेष मोहीम’ असणार आहे. बांधकाम कामगार, वीटभट्टी, झोपडपट्टी या ठिकाणी प्रामुख्याने लसीकरण होईल. बालकांच्या लसीकरणात हिपेटायटीस बी, रोटा, पीएल, पेंटा, न्यूमोनिया अशा लसींचा समावेश आहे. पहिले सत्र 7 ते 12 ऑगस्ट, दुसरे सत्र सप्टेंबर तर तिसरे सत्र ऑक्टोबरमध्ये पार पडणार आहे. त्यासाठी 150 वैद्यकीय अधिकार्‍यांना ऑफलाईन, तर 220 परिचारिकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली.

हेही वाचा :

मणिपूर हिंसाचार : महिला अत्याचार व्हिडिओ प्रकरणातील पाचव्या आरोपीला अटक

पुण्यातील लहान घरांचा मिळकतकर माफ करा : आमदार रवींद्र धंगेकर

Back to top button