महावितरण घेणार आता उघड्या फ्यूज पेट्या, तुटलेल्या तारांची तत्काळ दखल

महावितरण घेणार आता उघड्या फ्यूज पेट्या, तुटलेल्या तारांची तत्काळ दखल
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  उघड्या फ्यूज पेट्या, तुटलेल्या तारा इत्यादींची व्हॉट्सएपवर नागरिकांकडून महावितरणला माहिती मिळाल्यावर त्वरित दुरुस्ती करून संभाव्य अपघात टाळता यावेत, यासाठी मंडळ स्तरावर व्हॉट्सएप नंबर सुरू करण्यात आले आहेत. वीज ग्राहकांनी त्यावर संपर्क करण्याचे आवाहन पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे. पाऊस व वारा यामुळे वीजयंत्रणेमध्ये विविध कारणांमुळे धोके निर्माण होऊ शकतात. तारा तुटणे, तारांना झोल पडणे किंवा लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे आदी कारणांमुळे विद्युत अपघात होण्याची शक्यता आहे.

याबाबत नागरिकांनी महावितरणाला व्हॉट्सएप किंवा एसएमएसद्वारे माहिती दिल्यास तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश नाळे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत. तसेच नागरिकांनाही व्हॉट्सएप नंबरवर फोन करून तत्काळ माहिती देता येईल. ज्या नागरिकांकडे व्हॉट्सएप नाही त्यांनी 'एसएमएस'द्वारे तक्रार केल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.

नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टिंगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात यावेत. त्याबाबत संबंधित तक्रारकत्र्यांना स्पष्टपणे कळविण्यात यावे. कार्यालयांकडून तक्रारीचे ताबडतोब निवारण केल्यानंतर त्याची माहिती दुरुस्त केलेल्या वीजयंत्रणेच्या छायाचित्रासह दैनंदिन सुनियंत्रण कक्षाला कळविण्यात यावी. तसेच संबंधित तक्रारकत्र्यांना दुरुस्तीचे काम झाल्यासंबंधी दुरुस्तीनंतरचे संबंधित छायाचित्र व्हॉट्सएपवर पाठवून अथवा मेसेज पाठवून अवगत करण्यात यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

हे आहेत फोन नंबर
पुणे परिमंडळ अंतर्गत रास्ता पेठ मंडळ, गणेशखिंड मंडळ व पुणे ग्रामीण मंडळ यासाठी व्हॉट्सएप नंबर 7875767123 असा आहे. कोल्हापूर परिमंडल अंतर्गत कोल्हापूर मंडळासाठी 7875769103 व सांगली मंडळ यासाठी 7875769449 तसेच बारामती परिमंडळ अंतर्गत बारामती मंडळसाठी 7875768074, सोलापूर मंडळसाठी 9029140455 व सातारा मंडळासाठी 9029168554 व्हॉट्सअ‍ॅप नंबर सुरू करण्यात आले आहेत. हे सर्व व्हॉट्सअ‍ॅप नंबर दैनंदिन सुनियंत्रण कक्षामध्ये (डीएसएस रूम) उपलब्ध असलेल्या महावितरण कंपनीच्या मोबाईल क्रमांकावर सुरू करण्यात आले आहेत.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news