

यवत: पुढारी वृत्तसेवा : वरवंड (ता दौंड) ये. बी. सराफ अकलूजकर यांच्या सोन्याच्या दुकानात मंगळवारी रात्री दरोडा टाकण्यात आला असून सुमारे 75 लाख रुपये च्या आसपास किंमतीचे सोने आणि चांदीची चोरी करण्यात आला आहे वरवंड येथील मुख्य चौकात असणाऱ्या या दुकानामधील सुमारे 700 ग्रॅम सोने आणि 50 किलो चांदी लुटून चोरटे पसार झाले आहेत.
चोरट्यांनी या ठिकाणी दरोडा टाकताना सोन्याच्या दुकानातील सीसीटीव्ही वर स्प्रे मारला असून सीसीटीव्ही डाटा चा मशीन देखील चोरून घेऊन गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी यवत चे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे यांनी भेट दिली असून पुढील तपास करत आहेत.
हे ही वाचा :