घाटमाथ्याला आज रेड अलर्ट ; पुणे शहरात संततधारेचा इशारा | पुढारी

घाटमाथ्याला आज रेड अलर्ट ; पुणे शहरात संततधारेचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : घाटमाथ्याला बुधवारी रेड अलर्ट अर्थात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात मंगळवारी 200 मि.मी.पेक्षा पाऊस झाल्याने सलग दुसर्‍या दिवशीही त्यापेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पाऊस वाढणार आहे. जिल्ह्यात 22 जुलैपर्यंत मुसळधारेचा इशारा दिला आहे. राज्यात मान्सून जोरदार सक्रिय झाला असून, पुणे शहर अन् जिल्ह्यातही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मंगळवारी घाटमाथ्यावर सर्वत्र 150 ते 200 मिलिमीटर पाऊस झाल्याने शहरातही पावसाने हजेरी लावली. मात्र, पावसाचा जोर कमी होता. बुधवारी रेड अलर्ट दिल्याने शहरातही पावसचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. असाच पाऊस शहरात 22 जुलैपर्यंत राहणार आहे.

मंगळवारी सर्वत्र रिमझिम
मंगळवारी शहरात सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पहाटे 6 ते 7 पाऊस झाला, त्यानंतर थांबला. नंतर थोड्या वेळाच्या अंतराने दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. शिवाजीनगर, विद्यापीठ परिसर, एनडीए, बालेवाडी परिसर, कोथरूड, कर्वे रस्ता, मगरपट्टा, नगर रोड, कात्रज, सिंहगड, जुन्या पेठांमध्ये काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पाऊस थोड्या, थोड्या वेळाने सतत पडत असल्याने दिवसभर नागरिक रेनकोट घालूनच प्रवास करीत होते. मंगळवारी झालेला पाऊस (रात्री 11 पर्यंत) लोणावळा (64.5) चोवीस तासांत (200), लवासा (43), शिवाजीनगर (2), लवळे (2.5), हडपसर (0.5), कोरेगाव पार्क (0.5), बालेवाडी (0.5)

हे ही वाचा :

गडचिरोली जिल्ह्यात दोन जण पुरात वाहून गेले! वीज पडून एकाचा मृत्यू, दीडशेहून अधिक गावांचा संपर्क तुटला

कोल्हापूर : शाळकरी मुलाला अमानुष मारहाण करणार्‍या वाशीतील ‘त्या’ शिक्षकावर गुन्हा दाखल

Back to top button