

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : मध्यरात्रीपासून जिल्हृयाच्या सर्व भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने अनेक नदी, नाल्यांना पूर आला असून, दुपारपर्यंत २० प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद असल्याने जवळपास दीडशेहून अधिक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. मंगळवारी (दि. १८) धानोरा आणि भामरागड तालुक्यातील प्रत्येकी एक व्यक्ती पुरात वाहून गेली तर धानोरा तालुक्यातील कांदळी येथील एका मजुराचा वीज पडून मृत्यू झाला.
पुरामुळे गडचिरोली तालुक्यातील राजोली येथील ८, एटापल्ली तालुक्यातील हालेवारा येथील २ आणि एटापल्ली येथील ८ अशा एकूण १८ व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.