मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. चिंचवडचे माजी नगरसेवक राहुल कलाटे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्याबरोबर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही शिवसेनेत सामिल होणार आहेत. कलाटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली. पिंपरी चिंचवडच्या चार माजी नगरसेवकांसह कलाटे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहे.
बंडाच्या एक वर्षानंतरही ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत जाणाऱ्यांची संख्या काही थांबण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार मनीषा कायंदे, विधान परिषदेच्या निलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केला.
कोण आहेत राहुल कलाटे?
कलाटे कुटुंबीय 2001 पर्यंत काँग्रेसमध्ये होते. 2002 मध्ये राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर महापालिका निवडणुक लढवली. परंतु, त्या निवडणुकीत ते पराभूत झाले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कलाटे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढली. या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. 2017 ते पहिल्यांदा शिवसेनकडून नगरसेवक झाले. पालिकेत शिवसेनेचे गटनेते, तसेच शहराध्यक्षही होते. 2019 विधानसभेवळी भाजप शिवसेनेची युती असताना बंडखोरी केली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस अन वंचितचा पाठिंबा मिळाला. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांविरोधात निवडणूक लढली होती. दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीवेळी कलाटे यांनी मविआमधून बंडखोरी केली. मात्र, यावेळी राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त झाले.
हेही वाचा: