

जेजुरी : नितीन राऊत : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रा निमित्त पहाटे पासूनच जेजुरी गडावर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सोमवार अमावस्यादिवशी असलेल्या सोमवती यात्रेनिमित्त आज दुपारी 1 वाजता जेजुरी गडावरून श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा निघाला,श्री खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवताच लाखो भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करून 'येळकोट येळकोट जय मल्हार' चा जयघोष केला. यावेळी संपूर्ण गड भंडा-यानी न्हावून निघाला. देवा तुझी सोन्याची जेजुरी चां प्रत्यय भाविकांनी यावेळी अनुभवला.
श्री खंडोबा देवाचा पालखी सोहळा कऱ्हा नदी ला मार्गस्थ झाला असून सायंकाळी 5 वाजता कऱ्हा नदीवर उत्सव मूर्तींना स्नान घातले जाणार आहे. या सोहळ्यासाठी सुमारे चार लाखापेक्षा अधिक भाविक सहभागी झाले आहे. जेजुरी गडावर भक्तीचा महापूर पाहण्यास मिळाला.
हे ही वाचा :