पुणे : नवीन टर्मिनलचे 92 टक्के काम

पुणे : नवीन टर्मिनलचे 92 टक्के काम

पुणे : लोहगाव येथील बहुप्रतीक्षित नवीन विमानतळ टर्मिनलचे काम 92 टक्के पूर्ण झाले असून, त्याचे उद्घाटन सप्टेंबर 2023 मध्ये होण्याची शक्यता आहे. आगामी काळात आता लवकरच जुने आणि नवीन विमानतळ टर्मिनलची इमारत जोडण्याचे काम सुरू होणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून गेल्या अनेक वर्षांपासून या नव्या टर्मिनलचे काम सुरू होते. तब्बल 475 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तो प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जात असून, सप्टेंबर महिन्यानंतर पुणेकरांना या टर्मिनलचा वापर करता येण्याची शक्यता आहे.

या सुविधा मिळणार

प्रवाशांना विमानापर्यंत पोचविणारे 5 नवीन मार्ग (पॅसेंजर बोर्डिंग बि—ज)
8 स्वयंचलित जिने (एस्केलेटर)
15 लिफ्ट
34 चेक-इन काउंटर
प्रवासी सामान वहन यंत्रणा
आगमन क्षेत्रात पाच कन्व्हेयर बेल्ट

कार्गो टर्मिनलला मुहूर्त कधी?
पुणे विमानतळ परिसरात उभारण्यात येत असलेले नवीन कार्गो टर्मिनल तयार होऊन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या नवीन कार्गो टर्मिनलमुळे पुण्यातून होणारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मालवाहतुकीमध्ये दुपटीने वाढ होणार आहे. मे महिन्यात याचे उद्घाटन होईल असे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत याला मुहूर्त लागलेला नाही.

महत्त्वाचे मुद्दे…
जुने विमानतळ टर्मिनल – 22 हजार चौरस मीटर
नवीन विमानतळ टर्मिनल – 5 लाख चौरस फुटांपेक्षा अधिक क्षेत्रफळ
जुन्या टर्मिनलची प्रवासी क्षमता – 80 लाख प्रवासी (वार्षिक)
नवीन टर्मिनल प्रवासी क्षमता – 1 कोटी 90 लाख (वार्षिक)

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news