सहावीत शिकणा-या रोहनची नासाच्या क्युब ईन स्पेस कार्यक्रमासाठी निवड

सहावीत शिकणा-या रोहनची नासाच्या क्युब ईन स्पेस कार्यक्रमासाठी निवड

पुणे : पुढारी वृत्तसेवा : इयत्ता सहावीत शिकणार्या रोहन भन्साळी या पुणे शहरातील विद्या व्हॅली शाळेच्या विद्यार्थाची नासा या अमेरिकेतील अंताराळ संशोधन संस्थेच्या क्युब इन स्पेस प्रोग्रास साठी निवड झाली आहे. तळहातावर मावेल इतक्या लहान आकाराचा क्यूब अंतराळात पाठवला जाणार आहे त्याव्दारे अंतराळात मानवी शरीरावर अतिनिल किरणांचा काय परिणाम होतो यावर संशोधन करणार आहे.

नासाच्या वतीने अंतराळ मोहिमांची विद्यार्थांना माहिती व्हावी व तरुण संशोधक तयार व्हावेत या उद्देशाने क्युब इन स्पेस प्रोग्राम तयार करण्यात आला आहे. 11 ते 18 या वयोगटातील विद्यार्थासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आला असून त्यात तळहातावर मावेल इतक्या लहान आकाराची प्लास्टिकचा चौकोन अवकाशात पाठवला जाणार आहे.त्यात अतिनिल किरणांपासून यानातील शास्त्रज्ञांचे कसे संरक्षण होईल यावर संशोधन केले जाईल.

रेशीम,अ‍ॅल्युमिनीयम, प्लास्टिक वर अभ्यास..
अकरा वर्षाचा रोहन इयत्ता सहावीत शिकत आहे.त्याने सांगितले की नासा कडून माझी निवड होताच मी या स्पेस इन क्युब कार्यक्रमात अंतराळवीरांच्या शरीरावर अतिनिल किरणांचा (अल्ट्रा व्हायलेट रेज) चा काय परिणाम होतो हा विषय पाठवला त्यात माझी निवड झाली.त्यांनी 4 बाय 3 सेमी आकाराचा क्युबिकल मला पाठवला त्यात मी रेशीम,अ‍ॅल्युमिनीयम व प्लास्टिक चे नमूने नासाला पाठवले. हे नमूने नासा या छोट्या क्युबिकल व्दारे ऑगस्ट मध्ये अवकाशात सोडणार आहे.

हा क्युबिकल तळहातवर मावेल इतका छोटा असून त्यात मोयक्रो प्रोसेसर आहे तो दर पाच मिनिटांचे रिडींग पाठवणार आहे.त्याचे सर्व रिडींग मी भारतात माझ्या घरी बसूनच अभ्यासणार आहे.हा क्युबिकलने स्ट्रॅटोस्फिअर या अवकाशातील वातावरणाचा अभ्यास करता येणार आहे.1 लाख 64 हजार फूट उंचीवर हा वातावरणाचा थर असतो.

अंतराळ रोमांचक असून अजूनही अज्ञात आहे. सुर्यमालेची त्रिज्या 9 लाख कि.मी.ची असून एका सुर्यात 13 लाख पृथ्वी बसतील.मी अंतराळात जाणार्या मानवाने कोणते कपडे वापरावेत यासाठी रेशीम,अल्युमिनीयम व प्लास्टिक चे नमूने पाठवले आहेत.
                                                        – रोहन भंसाळी,संशोधक विद्यार्थी,पुणे

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news