राज्यात हलक्या पावसाचा अंदाज | पुढारी

राज्यात हलक्या पावसाचा अंदाज

पुणे : राज्यात पाऊस सक्रिय होण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. पुढील पाच दिवस किनारपट्टीवर मुसळधार, तर राज्याच्या अन्य भागांत हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. याबाबत माहिती देताना हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, की बंगालच्या उपसागरात चक्रिय स्थिती निर्माण झाली आहे.

तसेच, केरळपासून गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस पावसासाठी अनुकूल आहेत. धुळे, नाशिक, औरंगाबाद, जालनासह संपूर्ण विदर्भात पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

‘पीएमपी’त दमछाक ! पुण्यात ‘पीक अवर’ला तुफान गर्दी

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनवर भाजपचे वर्चस्व?

राज्यातील खाते वाटपाचा तिढा सुटणार? अजित पवार, प्रफुल्ल पटेलांचे अमित शहांसोबत खलबत

Back to top button