पुणे : पादचारी महिलेचा विनयभंग करणारा अटकेत

पुणे : पादचारी महिलेचा विनयभंग करणारा अटकेत
Published on: 
Updated on: 

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या बसस्टॉपजवळ निघालेल्या पादचारी महिलेचा ब्रिजखाली आल्यानंतर अंधारात विनयभंग करून पसार झालेल्या एकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. लक्ष्मण तुकाराम घोडे (रा. वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका महिलेने तक्रार दिली आहे. पीडित महिला काम संपवून ती बावधन येथे येण्यासाठी मनपा येथे आली होती. ती पायी चालत बावधन बसस्टॉपकडे जाण्यासाठी ब्रिजखालून जात असतानाच समोरून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्यासमोर येऊन अश्लील चाळे केले. तसेच, त्यांचा विनयभंग केला होता. क्षणभर घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केला आणि त्याचा पाठलागदेखील केला. पण, तो पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर महिलेने शिवाजीनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

याप्रकरणी गुन्हा नोंद करीत पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्हीची पडताळणी केली. त्यात कैद झालेल्या संशयिताची माहिती काढली. बातमीदारामार्फत संशयित आरोपी हा पुन्हा मनपा परिसरात आल्याची माहिती मिळाली. लागलीच पथकाने त्याला पकडले. चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रताप साळवे, मनीषा जाधव, पोलीस हवालदार रणजित फडतरे, बशीर सय्यद, रूपेश वाघमारे, आदेश चलवादी यांच्या पथकाने केली.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news