Home Minister Dilip Walse-Patil
पुणे
विकासकामे मार्गी लावण्यासाठी वेगळा निर्णय : दिलीप वळसे पाटील
मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव-शिरूर तालुक्यातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी वेगळा निर्णय घेतला असल्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी रविवारी (दि. 9) सांगितले. मंचर (ता. आंबेगाव) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात दिलीप वळसे पाटील बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर मंत्री झाल्यानंतर मेळावा घेऊन वळसे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
या वेळी भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, किरणताई वळसे पाटील, केशरताई पवार, संजय गवारी, सचिन भोर, अरविंद वळसे पाटील, सचिन पानसरे, अंकित जाधव, गोविंदशेठ खिलारी, शिवाजीराव ढोबळे, बाबासाहेब खालकर, गणपतराव इंदोरे, रामशेठ गावडे, दौलतभाई लोखंडे, संतोष सैद, प्रदीप आमोंडकर, संदीप थोरात, अरुण बांगर, प्रशांत बागल, वैभव उंडे, लक्ष्मण बाणखेले, पोपटराव थिटे, शांताराम हिंगे, संदीप थोरात, सोमनाथ काळे, भाऊसाहेब टाव्हरे, दिलीप लोखंडे, शांताराम हिंगे, उर्मिलाताई धुमाळ, बाळासाहेब वाळूंज आदी उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, डिंभे धरणातून बोगद्याद्वारे पाणी नगरला नेण्याची भूमिका पक्षातील काही नेत्यांची होती. मात्र, तालुक्याच्या भल्यासाठी या भूमिकेलाही विरोध केला. आताच्या सरकारने आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यात असलेले नदीवरील बंधारे यापुढील काळात पावसाच्या पाण्याने भरता येतील, त्यानंतर नाही, असा निर्णय घेतला आहे. तो निर्णय शेतकर्यांना उद्ध्वस्त करणारा आहे.
तालुक्यातील प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात व शरद पवार साहेबांबरोबर काम करत असताना अनेक पदे भूषवली. पवार साहेबांच्या माध्यमातून तालुक्यात विविध विकासकामे मार्गी लागली. मात्र, गेल्या काही दिवसात पक्षातील अनेक आमदारांची कामे होत नव्हती. याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी केल्या. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केले.
निकम यांनीही नशीब आजमावावे
देवदत्त निकम यांच्यावर नाव न घेता दिलीप वळसे पाटील यांनी टीका केली. विधानसभा निवडणुकीस अजून दीड वर्षे अवधी आहे. मला आमदारकी किंवा मंत्रिपदाची लालसा नाही. मात्र, तालुक्यातील काही जण माझ्या निष्ठेवर बोलत आहे. त्यांनी त्यांची निष्ठा तपासावी. त्यांना पक्षात विविध पदे दिली, मात्र तेच आज विरोधात बोलत आहेत. त्यांनीही निवडणूक लागल्यास त्यांचे नशीब आजममावे, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा

