आंबेगावातील चिमुकल्याची ‘पवारबाबा की जय’ घोषणा | पुढारी

आंबेगावातील चिमुकल्याची ‘पवारबाबा की जय’ घोषणा

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खा. शरद पवार हे पहिल्यांदा छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात सभा घेण्यासाठी जात होते. त्या वेळी शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यासोबत असलेल्या खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या मोबाईलवर आंबेगाव तालुक्यातून व्हिडीओ कॉल आला होता. तीन वर्षांच्या चिमुकल्याने ‘पवारबाबा की जय’ म्हटल्यावर शरद पवार यांनी त्याला दाद देत स्मितहास्य केले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आंबेगाव तालुका हा दिलीप वळसे पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे शरद पवार यांना धक्का बसला आहे. मात्र, आज त्याच आंबेगाव तालुक्यातून शरद पवार यांना चक्क व्हिडीओ कॉल करीत जाहीर पाठिंबा दिल्याने या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने आता चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक कार्यकर्ते सुरेश ऊर्फ अण्णा निघोट यांना दुपारी डॉ. कोल्हे यांनी मोबाईलद्वारे संपर्क केला आणि म्हणाले की, नमस्कार अण्णा, पवारसाहेब बोलतात. शरद पवार यांना पाहून सुरेश यांच्या आई ताराबाई हरिभाऊ निघोट भारावून गेल्या. काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे म्हणत जाहीर पाठिंबादेखील दिला.

हेही वाचा

नगर : पाच मंदिरांच्या दानपेट्या फोडणार्‍यांना बेड्या

दौंडमध्ये मतविभाजनाचा फायदा भाजपला

जान्हवीचा नवा प्रोजेक्ट ‘उलझ’

Back to top button