नगर : पाच मंदिरांच्या दानपेट्या फोडणार्‍यांना बेड्या | पुढारी

नगर : पाच मंदिरांच्या दानपेट्या फोडणार्‍यांना बेड्या

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील पाईपलाईन रस्त्यावरील एकवीरा चौकाजवळ असलेल्या सिद्धेश्वर मंदिराची दानपेटी फोडणार्‍या दोघांना तोफखाना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दानपेटी फोडून रक्कम चोरून नेल्याची घटना दि.24 जून रोजी घडली होती. मंदिराचे पुजारी देविदास मोहोळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. विजय सुनिल यालल (वय 19, रा.सिंधी कॉलनी, तारकपूर), रोहण अरुण साळवे (वय 18, रा.रामवाडी,अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. तोफखाना पोलिसांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी निष्पन्न केले.

विजय हा रामवाडी परिसरात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी विजय याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचा साथीदार रोहन अरुण साळवे याला ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून, एकूण पाच गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिद्धेश्वर मंदिर, डोकेनगर येथील साईबाबा मंदिर, सुर्या नगर येथील गणेश मंदिर, बालिकाश्रम येथील साईबाबा मंदिर, भिंगार येथील मानाचा गणपती मंदिर येथील दानपेट्या आरोपींनी फोडल्या होत्या.

पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख नितीन रणदिवे, उपनिरीक्षक समाधान सोळंके, दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, अविनाश वाकचौरे, संभाजी बडे, संदीप धामणे, सुरज वाबळे, वसिम पठाण, अहमद इनामदार, सतिष त्रिभुवन, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे, सतिष भवर, संदिप गिर्‍हे, गौतम सातपुते, सचिन जगताप, शफी सय्यद, यांनी ही कारवाई पार पाडली.

हे ही वाचा : 

पुणेकरांना दिलासा ! खडकवासला साखळीत अर्धा टीएमसीची भर 

सहा वर्षांनंतर पावसाळी अधिवेशन १५ दिवसांचे

Back to top button