

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चार अल्पवयीन मुलांसह पाच जणांनी मिळून एका तरुणावर खुनी हल्ला चढवला. ही घटना मंगळवारी (दि. 4) रात्री साडेदहाच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली. शिरीष विनायक गायकवाड (21, रा. गणेश गल्ली, नवी सांगवी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. हुसेन इमाम शेख (19, रा. लिंक रोड, बाणेर, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. तसेच, इतर चार अल्पवयीन मुलांवरही गुन्हा दाखल केला आहे.
मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी शिरीष व त्याचे मित्र रितेश शिरोळे व विनायक मुलतानी हे कृष्णा चौक नवी सांगवी येथे खाद्यपदार्थांच्या गाडीजवळ उभे होते. त्यावेळी चार अल्पवयीन मुले आणि आरोपी हुसेन दोन दुचाकीवरून तेथे आले. एक मुलगा व विनायक मुलतानी यांच्यामध्ये का पडतोस, असे अल्पवयीन मुलगा म्हणाला. त्यावेळी दुसर्या अल्पवयीन मुलाने त्याच्याजवळ असलेल्या कोयत्याने फिर्यादी शिरीष यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डाव्या पायाच्या मांडीवर, गुडघ्यावर, उजव्या पायावर सपासप वार केले. तसेच, अल्पवयीन मुलांनी त्याच्या हातातील लोखंडी रॉडने व बांबूने फिर्यादी यांच्या पाठीवर मारहाण केली. फिर्यादी यांना सोडविण्यासाठी त्यांचा मित्र रितेश शिरोळे हा आला असता त्यास देखील आरोपींनी लोखंडी रॉड व बांबूने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. \
हे ही वाचा :