उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! नीलम गोऱ्हे यांचा आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश | पुढारी

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! नीलम गोऱ्हे यांचा आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरे यांच्या गटाला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. शिवसेनेच्या रणरागिनी आणि ठाकरे गटाची बाजू खंबीरपणे मांडणाऱ्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गोऱ्हे यांचा आज दुपारी शिवसेनेत प्रवेश होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. मात्र त्या बंडानंतरचा हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. कारण नीलम गोऱ्हे ह्या केवळ विधान परिषदेच्या आमदार नाहीत तर त्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.

नीलम गोऱ्हे ह्या केवळ एक राजकीय नेत्या नसून तर त्यांनी पीडित महिलांसाठी मोठं काम उभं केलं आहे. एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून नीलम गोऱ्हें यांच्याकडे पाहिलं जातं. आजचा त्यांचा हा निर्णय उद्धव ठाकरे गटातली उरली सुरली नारजी समोर येत आहे. त्यांच्या या शिवसेना प्रवेशाने ठाकरेंना चांगलाच धक्का बसला आहे. महत्त्वाचं म्हणजे नीलम गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता तेव्हापासून त्या अत्यंत संयमाने आणि नेटाने, अभ्यासू वृत्तीने सतत शिवसेनेची बाजू मांडत असतात.

उद्धव ठाकरे यांच्या गटातील दीपाली सय्यद, मनिषा कायंदे यानंतर आता नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. आज सकाळपासूनच नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार, अशा चर्चा सुरु होत्या. अखेर नीलम गोऱ्हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं आज स्पष्ट होत आहे.

हेही वाचा

सर्वदूर पावसाने शेतकर्‍यांना दिलासा

Jailer Movie : कावला गाण्यात तमन्ना भाटियाच्या पहिल्या गाण्याची झलक (Video)

सर्वदूर पावसाने शेतकर्‍यांना दिलासा

Back to top button