पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद | पुढारी

पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

पुणे; पुढारी वृत्तेसवा : हडपसर येथील सराफी पेढीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने बेड्या ठोकल्या. माळवाडी रोडवरील तुपे सभागृहाजवळील मोकळ्या जागेतून या टोळीला पकडण्यात आले. पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. गणेश बबन लोंढे (वय 23,रा. तरडे वस्ती, महंमदवाडी), निरंजन दीपक ननवरे (वय 19, रा. वंडीशेगाव चौक, पंढरपूर, जि. सोलापूर), माऊली बंडू लोंढे (वय 21,रा. पांढरे मळा, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, त्यांचे अन्य साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

त्यांच्याकडून दोन कोयते, स्क्रू-ड्रायव्हर, मिरचीपूड, नायलॉन दोरी असा 10 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर 15 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या विरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उल्हास कदम, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, कर्मचारी शहाजी काळे, विनोद शिवले, शशिकांत नाळे, अकबर शेख यांच्या पथकाने केली.

हेही वाचा

पुणे : अवैध गावठी दारूअड्डा उद्ध्वस्त; एकवीस जणांना अटक

पुणे : घरफोड्यांत 11 लाखांचा ऐवज लंपास

कोल्हापूर : ‘उच्च शिक्षण सहसंचालक’चा कारभार पुन्हा चव्हाट्यावर!

Back to top button