पुण्यातील पोलिसही असुरक्षित! काचेच्या ट्युबने मारहाण | पुढारी

पुण्यातील पोलिसही असुरक्षित! काचेच्या ट्युबने मारहाण

पुणे : सार्वजनिक रस्त्यावर आरडा-ओरडा करून येणार्‍या-जाणार्‍या लोकांना शिवीगाळ करणार्‍या व्यक्तीला समाजावून सांगणार्‍या पोलिसाला शिवीगाळ करून काचेच्या ट्यूबने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी, मार्केट यार्ड पोलिसांनी गणेश भीमा शिंदे (वय 31, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) याला अटक केली. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. याबाबत पोलिस कर्मचारी समीर चव्हाण यांनी फिर्याद दिली. ही घटना 4 जुलै रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शिंदे हा बिबवेवाडी येथील निमंत्रण हॉटेलजवळील आशा पान टपरीशेजारी सार्वजनिक रस्त्यावर आरडाओरडा करून येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना शिवीगाळ करत होता. हा प्रकार पोलिस कर्मचारी चव्हाण यांच्या निदर्शनास आला. त्यांनी आपली ओळख सांगून त्याला समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे याने त्यांना शिवीगाळ करून ‘तुझ्यासारखे पोलिस खूप पाहिले, मार्केट यार्ड येथे माझ्यावर गुन्हा दाखल आहे.

पोलिस माझे काही करू शकत नाहीत,’ असे धमकावले. त्यानंतर चव्हाण यांच्या छातीवर धक्का देऊन रस्त्याच्या कडेला पडलेली काचेची ट्यूब उचलून त्यांच्या डोक्यात मारली. पोलिसांनी त्याला अटक करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.

हेही वाचा

मंत्री मुश्रीफ आज कोल्हापुरात; जंगी स्वागत : कागलमध्ये मेळावा

आज निवडणुका झाल्यास राज्यात भाजपच पुढे

सोलापूर : आषाढी वारीतून एस.टी.ला 50 कोटींचे उत्पन्न

Back to top button