ओतूर : तोतया वनअधिकाऱ्यास अटक; पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल | पुढारी

ओतूर : तोतया वनअधिकाऱ्यास अटक; पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल

ओतूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : वन अधिकारी असल्याची बतावणी करून नगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावर जड वाहतूक करणाऱ्या वाहने यांना अडवून पैशांची मागणी करणाऱ्या महाठकास खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असल्याची माहिती ओतूर वन विभाग कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. या महाठकाचे नाव राजेंद्र हरिश्चंद्र गटकळ (रा. राजुरी, ता. जुन्नर) असे आहे.

तो तोतया वन अधिकारी असल्याचे सांगून पैसे उकळत असल्याचे लक्षात येताच त्याला सापळा लावून रंगेहात पकडून ताब्यात घेऊन ओतूर पोलीस स्टेशन व आळेफाटा पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड संहिता १८६० कलम ३८४ अंतर्गत त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला जुन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

हेही वाचा

नगर : राहुरी राष्ट्रवादीचा शरद पवारांनाच पाठिंबा

Maharashtra Politics News | रामदास आठवलेंनी घेतली अजित पवारांची भेट

मोठा अनर्थ टळला! जालन्यात रेल्वेमार्गावर घातपाताचा कट; रुळावर ठेवला लोखंडी ड्रम

Back to top button