सिंहगड-पानशेत भागात बेकायदा हातभट्टी दारूधंद्यांवर कारवाई
वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सिंहगड-पानशेत भागातील बेकायदा हातभट्टी दारूधंद्यावर राज्य उत्पादन शुल्क सासवड उपविभागाच्या भरारी पथकाने धडक कारवाई केली. तब्बल 605 लिटर गावठी दारूसह एक जिप असा 8 लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दारू विक्री करणार्या हरी चव्हाण (वय 57, रा. किरकटवाडी, ता. हवेली), सचिन भोंडेकर (वय 34, रा. गोर्हे खुर्द, ता. हवेली) व उमेश ठाकर (वय 48, रा. कुरण, ता. वेल्हे) या तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत
. सिंहगड व पानशेत भागातील अवैध धंद्यांवर यापुढेही कारवाई करणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. गेल्या आठवड्यातही या भागात बेकायदा हातभट्टी धंद्यावर कारवाई करण्यात आली होती, त्यामुळे बेकायदा दारूधंदे चालकांची धावपळ उडाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे जिल्हा अधीक्षक सी. बी. राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी रात्री (दि. 3) उशिरा उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड उपविभागाचे निरीक्षक प्रवीण शेलार, दुय्यम निरीक्षक राम सुपेकर, प्रदीप मोहिते, सहायक दुय्यम निरीक्षक संदीप मांडवेकर आणि जवान रणजित चव्हाण, रामेश्वर चावरे व सुनील कुदळे यांच्या भरारी पथकाने कारवाई केली.
हेही वाचा

