वाडेकर, डॉ. भोसले, पाटील, लाटकर, कदम झाले अपर निबंधक; सहकार विभागातील पदोन्नत्यांमुळे समाधान | पुढारी

वाडेकर, डॉ. भोसले, पाटील, लाटकर, कदम झाले अपर निबंधक; सहकार विभागातील पदोन्नत्यांमुळे समाधान

 पुणे; पुढारी वृत्तसेवा : सहकार आयुक्तालयांतर्गत 5 सह निबंधकांच्या पदोन्नत्यांवर शासनाने बुधवारी शिक्कामोर्तब करून अपर निबंधकपदांवर नियुक्त्याही केल्या आहेत. त्यामुळे बरेच दिवस रेंगाळलेल्या पदोन्नत्या झाल्यामुळे सहकार विभागात समाधानाचे वातावरण आहे. या पदोन्नत्यांमुळे आता सह निबंधकांच्या पदोन्नत्यांचाही मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात आले. सहकार मंत्रालयातील विशेष कार्यअधिकारी व सहकारचे सह निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांची सहकार आयुक्तालयातील अपर निबंधक ज्ञानदेव मुकणे यांच्या 30 जून
रोजी सेवानिवृत्त झाल्याने रिक्त असलेल्या अपर निबंधकपदी (पतसंस्था) पदस्थापना करण्यात आली आहे.
लातूर विभागीय सह निबंधक डॉ. ज्योती लाटकर यांची सहकार आयुक्तालयातील अपर निबंधक नागनाथ येगलेवाड यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागेवर अपर निबंधक (तपासणी व निवडणूक) येथे पदस्थापना करण्यात आली आहे. साखर आयुक्तालयातील संचालक उत्तम इंदलकर 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्या रिक्त जागेवर पुणे विभागीय सह निबंधक डॉ. संजयकुमार भोसले यांची अपर निबंधक म्हणून पदोन्नतीने पदस्थापना साखर संचालकपदी (प्रशासन) करण्यात आली आहे.
तर साखर आयुक्तालयातील सहसंचालक संतोष पाटील यांनी अपर निबंधक म्हणून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातील सहव्यवस्थापकीय संचालक रमेश शिंगटे यांच्या सेवानिवृत्तीने रिक्त होणार्‍या पदावर करण्याचे आदेश सहकार विभागाचे उप सचिव सं. पु. खोरगडे यांनी काढले आहेत.

पणन मंडळ कार्यकारी संचालकपदी कदम

नागपूर विभागीय सह निबंधक संजय कदम यांची पदोन्नतीने पदस्थापना ही अपर निबंधक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यकारी संचालकपदी केली आहे. त्यामुळे पणन मंडळाच्या कामकाजासही आता गती मिळण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा

Back to top button