पुणे : भूखंड देण्यासाठी पालिकेकडून सोयीचा अर्थ; माजी विरोधी पक्षनेत्यांचा आरोप | पुढारी

पुणे : भूखंड देण्यासाठी पालिकेकडून सोयीचा अर्थ; माजी विरोधी पक्षनेत्यांचा आरोप

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खराडीतील महापालिकेच्या मालकीचा आरक्षित भूूखंड विकसकाला देण्यासाठी महापालिकेकडून सोईचा अर्थ लावला जात आहे. याबाबत राज्य शासनाने जागा देण्याबाबत कुठलेही आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे महापालिकेने या कागदपत्रांची पुन्हा छाननी करावी, अशी मागणी भाजप-शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे.

सर्व्हे नं. 53 व 54 मधील काही भाग असलेल्या तब्बल 15 हजार चौरस मीटरपेक्षा अधिक आरक्षित भूखंड विकसक कोलते पाटील यांना देण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू आहे. ती पूर्ण होण्याआधीच या विकसकाने भूूखंडावर ताबा मारण्याची कार्यवाही केली. त्यावर पालिकेने आता हा भूखंड सील केला आहे.

त्यावर माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी व माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन पालिकेच्या जागेचा ताबा घेणार्‍या कोलते पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच हा भूखंड विकसकाला देण्याचा निर्णय घेतल्यास उच्च न्यायालयात जाऊ, असा इशारा दिला आहे. दरम्यान, कोलते पाटील डेव्हलपर्सचे राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच कार्यवाही करीत आहोत, असे स्पष्ट केले.

हेही वाचा

Maharashtra Political Crisis : खोटं बोललो, तर पवारांची औलाद नव्हे : अजित पवार

पुणे : मंगेश माने गँगच्या म्होरक्याची धिंड

Back to top button