विद्यार्थ्याला स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण ; शिक्षिकेचे कृत्य | पुढारी

विद्यार्थ्याला स्टीलच्या रॉडने बेदम मारहाण ; शिक्षिकेचे कृत्य

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  एक 12 वर्षांचा मुलगा क्लासला गेला असताना बाथरूममध्ये गेला होता. त्या वेळी त्याच्या एका मित्राने बाहेरून बाथरूमचा दरवाजा लावल्याने संबंधित मुलाने दरवाजा जोरात वाजविला. या कारणावरून क्लासच्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला शिवीगाळ करीत स्टीलच्या रॉडने मारहाण केल्याने संबंधित शिक्षकेवर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2 जुलै रोजी कोथरूडमधील भुसारी कॉलनी या ठिकाणी घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत, तर त्यांची पत्नी डॉक्टर आहे. त्यांचा 12 वर्षांचा मुलगा हा रावेत येथील एका शाळेत सातवीत शिक्षण घेत आहे. त्यांनी आरोपी महिलेच्या क्लासची जाहिरात पाहली होती. त्यामध्ये ते राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज देहराडून यांच्या एन्ट्रन्स परीक्षेचे क्लास घेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलाला संबंधित शिक्षिकेकडे क्लास लावला होता.

क्लासला गेल्यानंतर तेथे तो बाथरूममध्ये गेला होता. त्याच्या एका मित्राने बाथरूमचा दरवाजा बाहेरून लावला. त्यामुळे तक्रारदार यांच्या मुलाने दरवाजा जोरजोरात वाजविल्याने क्लास घेणार्‍या संबंधित शिक्षिकेने तुला पोलिसात देईन, अशी धमकी देऊन स्टीलच्या रॉडने मुलाच्या हातावर मारहाण करीत दुखापत केली. दरम्यान, मुलगा घरी आल्यानंतर त्याने आईला सर्व प्रकार सांगितला.

हे ही वाचा : 

अभिनेता हर्षद वारसीने गोव्यात घेतले घर

कोकणात मुसळधार पावसाचा ‘अलर्ट’

Back to top button