Shah Rukh Khan | किंग खानचा अमेरिकेत शूटिंग दरम्यान अपघात, करावी लागली शस्त्रक्रिया | पुढारी

Shah Rukh Khan | किंग खानचा अमेरिकेत शूटिंग दरम्यान अपघात, करावी लागली शस्त्रक्रिया

पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडचा किंग खान शाहरूख यांचा अमेरिकेत शूटिंग दरम्यान अपघात झाला. या अपघातात त्याच्या नाकाला मार लागल्याने नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. दरम्यान, त्याला हॉस्पिटमध्ये दाखल केल असता, त्यांची नाकावर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली असून, तो या घटनेनंतर मुंबईत परतल्याचे वृत्त Pinkvilla ने दिले आहे. Pinkvilla हे भारतीय मनोरंजन आणि जीवनशैलीविषयी हिंदी आणि इंग्रजी बातम्या देणारे माध्यम आहे.

शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अशा परिस्थितीत लॉस एंजेलिसमध्ये शूट करत असताना त्याच्या नाकाला दुखापत झाली. दरम्यान येथील टीमने रक्तस्त्राव झाल्याने शारूखला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. यानंतर रक्तस्त्राव थांबवण्यासाठी त्याच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रियाही करण्यात आली. यानंतर अभिनेता शाहरुख खान पुन्हा घरी मुंबईला परतला.

पठाणनंतर शाहरुख खान लवकरच जवान या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत नयनतारा आणि विजय सेतुपतीही आहेत. अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते. ॲली दिग्दर्शित ‘जवान’ हा चित्रपट देशातील सर्वात थ्रिलर्स ॲक्शनपैकी एक आहे. कित्येक काळापासून चाहते या चित्रपटाच्या आहेत. दरम्यान, या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानची ही एक मोठी अपडेट समोर आली आहे.

हेही वाचा:

Back to top button