

ओतूर (पुणे); पुढारी वृत्तसेवा : ओतुर (ता.जुन्नर) येथील तेलदरा शिवारात विहिरीत पडलेल्या बिबट मादीला वाचविण्यात यश आले आहे. दशरथ भिवा केदार यांचे मालकीच्या गट नं ३०० मधील रहात्या घराशेजारील विहीरीत शनिवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास बिबट मादी वय अंदाजे दीड वर्ष विहीरीत पडली. ही बाब विहीर मालकाच्या लक्षात आल्यावर ओतूर वनविभागाला याची माहीती कळविण्यात आली.
ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक विश्वनाथ बेले, खोकले, तसेच मानिकडोह येथील बिबट निवारण केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकारी- डाॅ. चंदणसावणे, रेस्क्यूटीमचे किसन केदार, फुलचंद खंडागळे, शिवाजी मधे, गंगाराम जाधव, भरत पारधी, साहेबराव पारधी, गणपत केदार हे घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.
बिबट मादीस विहिरीबाहेर काढून माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अलीकडे बिबट्या विहिरीत पडून मृत्युमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आढळून येत आहे, ओतूर वनविभागाने तात्काळ घटनास्थळ गाठून बिबट मादीस विहिरी बाहेर काढल्याने जीवदान मिळाले आहे.
हेही वाचा