

संगमनेर शहर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : पुण्याहून नाशिककडे भरधाव वेगाने जाणार्या शिवशाही बसचा पत्रा उडून तो खासगी स्कूल बसला धडकला. सुदैवाने पत्रा मागील बाजूस अडकल्याने कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. काही वेळ मात्र विद्यार्थी घाबरले होते. याबाबत अधिक माहीती अशी की , शिवशाही बस ही बस पुण्याहून नाशिककडे भरधाव वेगाने जात होती. शुक्रवारी (दि. 30) दुपारच्या वेळेस ही बस चंदनापुरी घाटात आली असता तिचा पत्रा उडाला.
नेमकी याच वेळेस शालेय विद्यार्थ्यांना घेवून बस रस्त्याने जात होती . शिवशाही बसचा उडलेला पत्रा सुदैवाने स्कूल बसच्या मागील बाजूस धडकला व तो बसलाच अडकला. यामुळे मोठा आवाज झाला. अचानक पणे झालेल्या घटनेने विद्यार्थी व चालकही घाबरला
स्कूल बस तात्काळ थांबविण्यात आली. शिवशाही बसही थांबली. या अपघातात बस मधील प्रवासी, विद्यार्थी सर्वच खाली उतरले . नागरिकही जमा झाले. सुदैवाने यात कुठलीच जीवित हानी झाली नाही. याची माहीती महामार्ग पोलिसांना देण्यात आली. पोलिस ही घटना स्थळी आले. बराच वेळ या बस उभ्या होत्या. पाहणी केल्यानंतर दोन्ही बस पुन्हा मार्गस्थ झाल्या.
हे ही वाचा :