पुणे : फुटबॉल खेळताना वाद; तरुणास बेदम मारहाण | पुढारी

पुणे : फुटबॉल खेळताना वाद; तरुणास बेदम मारहाण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फुटबॉल खेळताना झालेल्या वादातून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना वानवडी भागात घडली. या प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल झाला असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. निहीर चंद्रकांत पटेल (वय 32), किशन पंडित दळवी (वय 28), ब्रायन अलेक्झांडर (तिघे रा. घोरपडी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत साहिल सुनील सिन्हा (वय 31) याने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल आरोपी निहीरच्या ओळखीचा आहे. फुटबॉल खेळताना त्यांच्यात वाद झाला होता. आरोपी निहीर, किशन, ब्रायन यांच्यासह साथीदार साहिल राहत असलेल्या सोसायटीत शिरले. साहिलला शिवीगाळ केली. सदनिकेत शिरून आरोपींनी तोडफोड केली. साहिलला मारहाण केली. त्या वेळी सोसायटीतील रहिवाशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ करून धमकावले. साहिलला वाचविण्यासाठी कोणी पुढे आले, तर त्याला जीवे मारू, अशी धमकी दिली. सोसायटीच्या आवारात दहशत माजवून आरोपी पसार झाले. पोलिस उपनिरीक्षक शितोळे तपास करत आहेत.

हेही वाचा

पुणे : गॅस दाहिनीच्या उद्घाटनाची घाई कशासाठी?

नगर : लंकेंविरोधात विखेंचा नवा डाव ; केवळ एक जागा असताना नगराध्यक्षपद बळकावण्याची तयारी

सांगली : ग्रामविकास अधिकारी जाधव, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक मुल्ला निलंबित

Back to top button