पुणे : चांदणी चौकातील ऐन रहदारीत स्टेअरिंग रॉड तुटून टेम्पो ट्रॅव्हलर पलटी | पुढारी

पुणे : चांदणी चौकातील ऐन रहदारीत स्टेअरिंग रॉड तुटून टेम्पो ट्रॅव्हलर पलटी

पुढारी ऑनलाईन : सतत वर्दळ असलेल्या आज सकाळी चांदणी चौकात खासगी टेम्पो ट्रॅव्हलर पलटी झाला. यात प्रवास करणारे  चारही जण किरकोळ जखमी झाल्याचं समजत आहे.  या दरम्यान चांदणी चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार हा टेम्पो कर्वेनगरहून हिंजवडीच्या दिशेने जात होता. चांदणी चौकादरम्यान त्याचा स्टेअरिंग रॉड तुटला. दरम्यान सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं समोर येत आहे. दरम्यान वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी टेम्पो रस्त्यातून बाजूला करण्याचे काम वेगाने सूरु आहे.

हे ही वाचा :

पुणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह सात पोलिसांचे जणांचे तडकाफडकी निलंबन

पुणे जिल्ह्यातील कडूस गावाला आले पोलिस छावणीचे स्वरूप

Back to top button