पुणे जिल्ह्यातील कडूस गावाला आले पोलिस छावणीचे स्वरूप | पुढारी

पुणे जिल्ह्यातील कडूस गावाला आले पोलिस छावणीचे स्वरूप

कडूस : पुढारी वृत्तसेवा :  कडूस (ता. खेड) येथे गुरुवारी (दि. २९) आषाढी एकादशीच्या दिवशी कङूस गावचे माजी उपसरपंच तसेच विद्यमान सदस्य शाबिर शौकत इनामदार (मुलाणी, वय ३९) व त्याचा भाऊ शाकिर शौकत इनामदार (मुलाणी, वय ४०, दोघेही रा. मोमिन आळी कडूस, ता. खेड) यांनी गोहत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यांच्या निषेधार्थ शुक्रवारी (दि.३०) कडूस गावात कडकडीत बंद पाळण्यात आला असून कडूस गावाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.

कडूस गावात गुरूवारी तणावाचे वातावरण होते. शुक्रवारी शांतता असून खेड पोलिस स्टेशन व दगंल नियंत्रण पथक जुन्नर विभाग यांच्या वतिने संपूर्ण गावात पेट्रोलिंग करण्यात येत आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी पोलिस प्रशासनाच्या वतिने घेण्यात आली आहे. गुरूवारी खेड पोलिस स्टेशनने गोवंश हत्या सुरक्षा महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा भारतीय प्राणी संरक्षण कायद्याप्रमाणे कठोर कारवाई केली.

पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांच्या आदेशाने अप्पर पोलिस अधिक्षक मितेश गट्टे, उपविभागिय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीण पथकाचे पोलिस निरिक्षक शिळिमकर, खेडचे पोलिस निरिक्षक राजकुमार केंद्रे यांच्या पथकाने कडूस येथे गोपनीय माहिती काढून अवैध गोवंश हत्या करून गोमासाची वाहातुक करण्याच्या तयारीत असलेले इसम शाबिर शौकत इनामदार (मुलाणी) आणि शाकिर शौकत इनामदार( मुलाणी) यांना ताब्यात घेतले.

त्याच्या कब्जात १ लाख २६ हजार रुपये किमतीचे बेकायदेशीर कत्तल केलेल्या जनावरांचे ७०० किलो वजनाचे मास, ३ लाख २७ हजार रुपयांच्या ३ जिवंत गाई, दोन कालवडी, दोन म्हशीच्या पारड्या बोलेरो पिकअप टेम्पो, १० लाख १८ हजार रुपयांची काळ्या रंगाची आँडी कार गाडीच्या डिक्कीमध्ये दोन पांढऱ्या प्लॅस्टिक पिशवी मध्ये १०० किलो गोमास एकूण १४ लाख ७१ हजार रुपयांचा असा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला होता. त्यातील एका आरोपिस जागेवर पडून यांच्यावर प्राण्यांचे छळ प्रतिबंधक अधिनियमाचे, मोटार अधिनियमाचे कलम दाखल करून गुन्हे दाखल करत सदर गुन्हे कामी अटक करण्यात आली आहे.

दरम्यान गुरुवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास हजारो युवक एकत्र येत निषेध मोर्चा काढण्यात आला. संबंधित आरोपीकडून रहदारीच्या ठिकाणी मुख्य गावठाणात गोहत्या गोवंश हत्या करून मासाची वाहातुक आणि विक्री सातत्याने केली जात होती. मात्र ही धक्कादायक घटना गुरवारी (दि. २९) उघडकिस आली.

या कामगिरीमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखा पुणे ग्रामीण येथील सहायक पोलिस निरीक्षक आर. बी. गावडे, एम. बी. घोडके, हवालदार भुजबळ, बी. एन. खडके, निलेश सुपेकर, डी. टी. विरकर, पोलिस निरिक्षक राजकुमार केंद्रे, सहायक पोलिस निरीक्षक लाड, एम. डी. भवारी, घोलप, बिडकर, गोडसे, लोहार, गव्हाणे, शिगाडे, रेपाळे यांच्या पथकाने कारवाई केली.

कङूस गावात कुठल्याही अनुचित प्रकार घडून नये म्हणून पोलिस निरिक्षक राजकुमार केंद्रे, सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड, उपनिरिक्षक वर्षाराणी घाटे, सहायक फौजदार संदिप कारभळ, पोलिस हवालदार संतोष घोलप, गणेश जगताप, स्वप्निल लोहार, विशाल कोठावळे, किशोर वाळुंजकर, पोलिस नाईक निलम वारे, सविता उभे, अर्जुन गोडसे, पोलिस पाटील नवनाथ काळोखे, दगंल नियंत्रण पथक जुन्नर विभाग आदीनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

हे ही वाचा :

नाशिक : वृद्धाच्या पेन्शनची रक्कम लांबविणारा भामटा तासाभरात जाळ्यात

साखर उद्योग कोसळण्याचा धोका!

Back to top button