पुण्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला | पुढारी

पुण्यात तरुणीवर कोयत्याने हल्ला

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध ठिकाण असलेले सदाशिव पेठे पेरुगेट पोलीस चौकीजवळ एका तरुणीवर तिच्या मित्रानेच कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. दर्शना पवार हिचा खून झाल्याची घटना नुकतीच ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मारुती मंदिराजवळ तरूणी थांबली होती.

त्यावेळी हल्लेखोर तरूण तेथे आला आणि त्याने तरुणीशी वाद घालायला सुरुवात केली. वाद घालता असताना त्याने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. मात्र एका तरुणानी तिला वाचवलं. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून पोलिस अधिक तपास करत आहेत. प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा

नाशिक : अनुकंपा तत्त्वानुसार २७ पाल्यांना मिळणार खाकी

सातारा : पांचवडच्या जनावरांच्या बाजारात ईदसाठी बकरी खरेदीला गर्दी

पुण्यात कोयता गँगचा पुन्हा धुडगूस; अरण्येश्वर भागात दहशत माजवत केली वाहनांची तोडफोड

Back to top button