इंदापूर : पालखी महामार्गाच्या कामामुळे वारकर्‍यांचा प्रवास झाला सुखकर | पुढारी

इंदापूर : पालखी महामार्गाच्या कामामुळे वारकर्‍यांचा प्रवास झाला सुखकर

इंदापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : संत श्री तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील इंदापूर ते बावडापर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू असल्याने वारकर्‍यांचा प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासनासह कंत्राटदाराने कंबर कसली होती. या वेळी पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्याने वारकर्‍यांसह प्रवाशांनी देखील सुरू असलेल्या दर्जेदार कामाचे कौतुक केले. या कामामुळे वारकर्‍यांचा प्रवास सुखकर झाला.

पालखी मार्गाचे काम सुरू झाल्याने यावर्षी प्रथमच पालखीचा प्रवास नवीन मार्गावरून होणार होता. काही ठिकाणी अपूर्ण असलेल्या कामामुळे अडचण निर्माण होते की काय या शंकेने संपूर्ण प्रशासन दबावात होते. मात्र, पालखी प्रवास जागोजागी एन. पी. इन्फ्रा कंपनीकडून सुविधा देण्यात आल्यामुळे पालखी प्रवास सुखकर झाला. शुक्रवारी (दि. 23) जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन इंदापूर ते सराटी महामार्गावर होत असताना सुरवड येथे नितीन पुरुषोत्तम तापडिया एन. पी. इन्फ्रा या कंपनीने सहकुटुंब तसेच राजेंद्र घोरपडे व सर्व कर्मचार्‍यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले.

तुकाराम महाराज संस्थान, देहू गावचे माजी अध्यक्ष बापू महाराज मोरे, विश्वस्त संजय मोरे, पोलिस निरीक्षक दिलीप पवार, बांधकाम विभागाचे अभियंता भोसले यांच्या हस्ते वारकर्‍यांना महाप्रसाद, उपवासाचे पदार्थ व प्रवासी बॅगचे वाटप करण्यात आले. पालखी महामार्गाचे सुरू असलेले रस्त्याचे काम अतिशय चांगल्याप्रकारे सुरू असल्यामुळे यावर्षी पालखीचा प्रवास सुखकर झाला असल्याचे मत पालखी देवस्थानचे अध्यक्ष व वारकर्‍यांनी व्यक्त केले.

हेही वाचा

पुणे : मोबाईलवरून भरा व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज

कोल्‍हापूर : उद्योजक संतोष शिंदे मृत्यू प्रकरण : निष्पाप अर्जुन, बिचार्‍या तेजस्विनीचा काय दोष?

औरंगजेबाचे उदात्तीकरण चुकीचे : छत्रपती संभाजीराजे; खालच्या थराचे राजकारण थांबवा

Back to top button