इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात ! महिलेला जावं लागलं घृणास्पद प्रकाराला सामोरं | पुढारी

इन्स्टाग्रामवरील मैत्री पडली महागात ! महिलेला जावं लागलं घृणास्पद प्रकाराला सामोरं

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ठाण्यातील महिलेबरोबर इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून औरंगाबाद येथील तरुणाने तिला पुण्यात भेटून बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी त्याच्यावर ठाणे येथील महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गुन्हा समर्थ पोलिसांकडे वर्ग करण्यात आाला आहे.

गणेश छगन रघू (27, रा. मुंजा खोरा, ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत 38 वर्षांच्या महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली होती. नंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. तिचा विश्वास संपादन करून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

हे ही वाचा : 

सांगली जिल्हा परिषदेत 751 जागांची भरती; जुलैमध्ये पहिली जाहिरात शक्य

महामार्गावरील 24 तास गस्त बंद करू नका ; वाहनचालकांकडून मागणी

Back to top button