वडगाव मावळ : गोरक्षकांनी केली 43 जनावरांची सुटका | पुढारी

वडगाव मावळ : गोरक्षकांनी केली 43 जनावरांची सुटका

वडगाव मावळ(पुणे) : पुणे जिल्ह्यातील गोरक्षकांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथे कत्तलीसाठी नेण्यात येणार्‍या 43 जनावरांची सुटका केली आहे. गोरक्षा दल महाराष्ट्राचे पुणे संयोजक ऋषी कामथे यांना वैराग येथून काही गाड्यांमधुन जनावरे धाराशिवकडे कत्तलीसाठी जाणार असल्याची माहिती मिळाली होता. त्यांनी ततात्काळ अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्याशी संपर्क केला असता गोरक्ष दलाच्या कार्यकर्त्यांनी वैराग येथे जाऊन पोलिसांच्या मदतीने सापळा रचून कारवाई केली.

वैराग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विनय बहीर यांच्या सहकार्याने जिल्हाध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरक्षा दलाचे ऋषिकेश कामथे, अक्षय कांचन, राहुल कदम, दर्शन वहिले, प्रसाद झेडंगे, रोहित बागल. अर्जुन देशमुख, मृणाल मोरे, ओंकार
पाटील, विशाल निंलाखे, सत्यवान ताटे, मनोज पवार, शुभम मुंडे, प्रसाद जोशी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

पहिली गाडी सुधीर बहिरवाडे यांना मिळून आली, त्यात गोरक्षकांना 38 लहान जर्शी वासरे मिळाली तर दुसर्‍या ठिकाणी मोहोळ रोडला ऋषि कामथे यांना आढळलेल्या गाडीत पाच जर्सी गाई कोंबून कत्तली घेऊन जाताना दिसल्या. संबंधित वाहने पोलिस ठाण्यात नेण्यात आल्या. कारवाईनंतर संबंधित जनावरे अहिंसा गोशाळेत रवाना करण्यात आली.

हेही वाचा

मंचर : काठापूर बुद्रुकला बिबट्याचे दर्शन

पोवाचीवाडीच्या पोलिस पाटलाचा निर्घृण खून

पिंपरी : पावसाळ्यात वीज यंत्रणेपासून राहा सावध!

Back to top button