हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून मारहाण; पिंपरीतील घटना | पुढारी

हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून मारहाण; पिंपरीतील घटना

पिंपरी (पुणे) : दुचाकीचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून एकाच्या कानशिलात लगावली. ही घटना गुरुवारी (दि. 22) सायंकाळी सहाच्या सुमारास ओझर्डे, मावळ येथे घडली. या प्रकरणी अक्षय कुंडलिक पारखी (27, रा. ओझर्डे, मावळ) यांनी शुक्रवारी (दि. 23) शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दत्तात्रय ओझरकर, रामदास ओझरकर, लक्ष्मण ओझरकर, भानुदास ओझरकर, तानाजी ओझरकर, अर्जुन ओझरकर, शंकर ओझरकर (सर्व रा. ओझर्डे, मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे.

आरोपी दत्तात्रय ओझरकर रस्त्याने कार घेऊन जात होता. त्यावेळी फिर्यादी यांनी दुचाकीचा हॉर्न वाजवला. या कारणावरून दोघांच्यात वाद झाला. त्यानंतर आरोपी आपसात संगनमत करून हातात काठ्या घेऊन फिर्यादी यांच्या दिशेने येऊ लागले. त्यामुळे फिर्यादी ओझर्डे येथील एका हॉटेलमध्ये लपून बसले. त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांचे वडील कुंडलिक पारखी व आई यांना शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच आरोपी शंकर ओझरकर यांनी फिर्यादी यांच्या वडिलांच्या कानाखाली मारल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

हेही वाचा

पिंपरी-चिंचवड शहरातील स्वच्छतागृहांची माहिती एका क्लिकवर

पुणे : बीजे महाविद्यालय दहावे ; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून क्रमवारी जाहीर

पुणे-मुंबई महामार्गावर गॅस टँकर पलटी; 50 पोलीस घटनास्थळी

Back to top button