टॉमेटोला मिळतोय सोन्याचा भाव | पुढारी

टॉमेटोला मिळतोय सोन्याचा भाव

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  टॉमेटोच्या क्रेटला (20 किलो) बाराशे ते तेराशे रुपये बाजारभाव मिळत आहे. परिणामी, आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात टोमॅटोच्या बागा बांधणीची कामे जोरात सुरू आहेत. तालुक्याच्या पूर्वभागात उन्हाळी हंगामात टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतात. यंदाही टोमॅटोचे पीक शेतकर्‍यांनी घेतले. परंतु, सुरुवातीला बाजारभावाची साथ मिळालीच नाही. अनेक शेतकर्‍यांनी बागा सोडून दिल्या. आता मात्र टोमॅटोच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. नारायणगाव (ता.जुन्नर) येथील बाजारात क्रेटला बाराशे ते तेराशे रुपये बाजारभाव मिळत आहे.

बाजारभावात वाढ झाली, तरी परिसरात टोमॅटो उत्पादकांकडे आता टोमॅटो शिल्लक नाही. काही शेतकर्‍यांनी टोमॅटोच्या पिकाची लागवड केली. परंतु वातावरणातील अतिउष्णतेमुळे पिकावर पांढरी माशी, करपा आदींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या टोमॅटो बागा उद्ध्वस्तही झाल्या. आता टोमॅटोच्या बाजारभावात वाढ झाली असली, तरीदेखील शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच आहे. सध्या नागापूर, गांजवेवाडी, वळती, शिंगवे आदी परिसरात टोमॅटोच्या बागा बांधणीची कामे सुरू आहेत.

हे ही वाचा : 

तब्बल आठ वर्षांनंतर संशयित जाळ्यात ! गैरव्यवहारप्रकरणी कारवाई

New Power Tariff : वीज दिवसाला ८ तास २० टक्क्यांपर्यंत स्वस्त

Back to top button