आळंदी : पुढारी वृत्तसेवा : येणार्या लोकसभा निवडणुकीत महेश लांडगे यांच्यासारखा पहिलवान लोकसभेत पाहिजे. लोकसभेत अर्थसंकल्प मांडताना मला माझ्या शेजारी महेशदादाला बसायला पाहायला आवडेल, असे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी आळंदी येथे सांगितले. त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघावर भाजपने दावा केला असल्याचे दिसून आले. आळंदी येथील फ—ुटवाला धर्मशाळा येथे आयोजित भारतीय जनता पक्षाच्या शिरूर लोकसभा मतदारसंघात मोदी ऽ 9 महाजनसंपर्क अभियानंतर्गत जाहीर सभेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत.
त्यामुळे मोदी ऽ 9 महाजनसंपर्क अभियानामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे, असे मत दानवे पाटील यांनी व्यक्त केले. या अभियानांतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आयोजित कार्यक्रमात आमदार महेश लांडगे, माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, प्रदीप कंद, शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, आशा बुचके, जयश्री पलांडे, विकास डोळस, संजय घुंडरे, वैजयंता कांबळे, शांताराम भोसले, प्रिया पवार, कोमल काळभोर-शिंदे, माउली बनसोडे, आकाश जोशी, संकेत वाघमारे तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
दानवे पाटील म्हणाले, "मोदी सरकारने केलेली विकासकामे आणि योजना घराघरापर्यंत पोहोचवणे या अभियानाचा उद्देश आहे. याचीच परिणती म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षामध्ये नवचैतन्य संचारले आहे. लांडगे म्हणाले की, शासनाच्या योजनां लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या भावना जाणून घेतल्या जात आहेत. देशातील बदललेली परिस्थिती नवमतदारांना आकर्षित करत आहे. कमी झालेला भ्रष्टाचार, देशाची उंचावलेली प्रतिमा यामुळे तरुणवर्गातही भाजपची क्रेझ वाढत आहे. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले. महेंद्र खंडारे यांनी सूत्रसंचलन केले, तर माजी नगराध्यक्षा वैजयंता कांबळे यांनी आभार मानले.
हे ही वाचा :