Modi surname remark: rahul gandhi
Modi surname remark: rahul gandhi

Modi surname remark | सत्याचाच विजय! राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळताच काँग्रेसच्या गोटात आनंदोत्सव

Published on

पुढारी ऑनलाईन : 'मोदी आडनावाची बदनामी केल्याच्या प्रकरणात काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. गांधी यांना गुजरातच्या कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती व गुजरात उच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केले होते. यावर गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर 'सत्याचाच विजय होता!' असे म्हणत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी न्यायालयाच्या निकालाचे (Modi surname remark) स्वागत केले आहे.

मल्लिकार्जुन यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, राहुल गांधी यांना न्याय मिळाला आहे. लोकशाहीचा विजय झाला आहे. न्यायालयाने संविधानाचे समर्थन केले आहे. राहुल गांधी यांच्याविरोधी तक्रार करणारे भाजपचे आमदार पूर्णेश गांधी यांच्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला आहे. सत्ताधाऱ्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना द्वेषपूर्ण लक्ष्य करणे थांबवण्याची वेळ (Modi surname remark) आली आहे, असेही काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 'मोदी' आडनाव टिप्पणी बदनामी प्रकरणात राहुल गांधींच्या (Modi surname remark) शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील AICC मुख्यालयात आनंदोत्सव साजरा केला.

Modi surname remark: राहुल गांधी 'बाजीगर' होतील- पवन खेरा

आम्ही उर्जेने ओतपोत झालो आहोत. आम्हाला न्याय अपेक्षित होता आणि न्याय मिळाला. पुढे बघा, राहुल गांधी 'बाजीगर' ही होतील. सत्याचा विजय होईल… लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास आज दृढ झाला आहे: 'मोदी' आडनाव टिप्पणी बदनामी प्रकरणात राहुल गांधींच्या शिक्षेवर SC ने स्थगितीचा निर्णय देण्यावर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

राहुल गांधींविरुद्धचा कट आज फसला-खा. अधीर रंजन चौधरी

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासाठी मोठा दिलासा आहे. राहुल गांधींविरुद्धचा कट आज फसला… आम्ही आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली आणि राहुल गांधींना संसदेत हजर राहण्याची परवानगी द्यावी, हा मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधींची अपात्रता रद्द करावी…असेही पत्र मी लोकसभा अध्यक्षांना लिहीन, काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी व्यक्त केले आहे. मोदी आडनाव बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

लोकसभेतून अपात्र ठरवण्याचे सर्व कारस्थान अयशस्वी- भूपेश बघेल

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय आहे. राहुल गांधींना लोकसभेतून अपात्र ठरवण्याचे सर्व कारस्थान अयशस्वी झाले आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे त्यांना संसदेपासून दूर ठेवायचे होते, म्हणून हे कारस्थान करण्यात आले. आम्ही SC च्या निर्णयाचे स्वागत करतो आणि राहुल गांधींजी अपात्रता मागे घेतली पाहिजे, असे मत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी म्हटले आहे.

राजकीय षडयंत्रामुळे राहुलगांधींवर गुन्हा-सुखविंदर सिंग सुखू

सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. याचा अर्थ तक्रारकर्त्यांची खात्री खोटी होती. शेवटी सत्याचा विजय होतो. त्यामुळे राहुल गांधींचे लोकसभेचे सदस्यत्व बहाल केले जावे. राहुल गांधी यांची पदयात्रा देशातील द्वेष संपवण्यासाठी होती. राजकीय षडयंत्रामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हा संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा होता, असे मत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news