पुणे : भूसंपादन-पर्यावरणात अडकले वाहतुकीचे प्रकल्प | पुढारी

पुणे : भूसंपादन-पर्यावरणात अडकले वाहतुकीचे प्रकल्प

हिरा सरवदे : 

पुणे : शहर व जिल्ह्याच्या वाहतुकीवर परिणाम करणारे 25 पेक्षा अधिक प्रकल्प भूसंपादन, पर्यावरण आणि राजकीय हेवेदावे-कुरघोड्या या कचाट्यात अडकले आहेत. हे प्रकल्प प्राधान्याने सोडविण्यासाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेने प्रयत्न केल्यास शहरासह जिल्ह्यातील वाहतुकीचा प्रश्न बर्‍यापैकी निकाली निघू शकतो.

शहरीकरणाचा वेग आणि लोकसंख्यावाढीमुळे दिवसेंदिवस वाहनांची संख्या
वाढत आहे. परिणामी, वाहतुकीसाठी रस्ते कमी पडून वाहतूक कोंडी वाढत आहे. कोंडीची ही समस्या केवळ शहरात नाही, ग्रामीण भागातही पाहायला मिळते. ही समस्या दूर करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह शासनाकडून नवनवीन रस्ते, रस्तारुंदीकरण, उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर, रेल्वेमार्गाचा व स्थानकांचा विस्तार, विमानतळांचा विस्तार आदी उपाययोजना केल्या जातात. मात्र, या प्रकल्पांसाठी भूसंपादन करण्यामध्ये अनेक अडचणी येतात. याशिवाय प्रकल्पांविरोधात पर्यावरणप्रेमी न्यायालयात जातात.

तसेच राजकीय नेतेमंडळींचे हेवेदावे आणि कुरघोड्या या कारणांमुळे अनेक प्रकल्प कागदावरच राहतात, तर काही प्रकल्प अर्धवट स्वरूपात जागेवरच थांबतात. अशाच प्रकारे पुणे शहर आणि जिल्ह्याच्या वाहतुकीवर परिणाम करणारे 25 पेक्षा जास्त प्रकल्प भूसंपादन व पर्यावरणाच्या कचाट्यात अडकले आहेत. यातील काही प्रकल्प अर्धवट आहेत, काही कागदांवर आहेत तर काही केवळ चर्चेपुरतेच मर्यादित राहिले, ते कागदावरही येऊ शकले नाहीत.

भूसंपादन, पर्यावरण व राजकीय कुरघोड्यांच्या कचाट्यात लटकले काही प्रकल्प

पुणे विमानतळ
पीएमआरडीए, एमएसआरडीसी रिंग रोड
एचसीएमटीआर
मेट्रो विस्तार
शहरातील विविध रस्त्यांच्या मिसिंग लिंक
बीआरटीएस
शिवणे-खराडी रस्ता
पाषाण ते कोथरूड बोगदा
पाषाण ते सेनापती बापट
रस्ता बोगदा
सिंहगड रस्ता ते पद्मावती बोगदा
बालभारती-पौड फाटा रस्ता
509 चौक ते धानोरी रस्ता
कात्रज-कोंढवा रस्ता
पार्किंग धोरण
रिंग रेल्वे (चाकण, तळेगाव, शिक्रापूर, उरुळी कांचन, फुरसुंगी)
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे
पुणे-मुंबई हायस्पीड रेल्वे
एसटी बस व पीएमपी बस टर्मिनल
महामार्गांचे रुंदीकरण (पुणे-नगर, पुणे-सोलापूर, पुणे-नाशिक, पुणे-मुंबई, पुणे-कोकण, पुणे-सातारा, पुणे-सासवड)

हे ही वाचा : 

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये वीज पडून ७ जणांचा मृत्यू

कारवाईपूर्वी कुरुलकरकडून मोबाईलशी छेडछाड

Back to top button