पुणे : कुरुलकरच्या गुन्ह्यात कलम वाढ ; पाकिस्तानी ललनेलाही बनविले सहआरोपी

पुणे : कुरुलकरच्या गुन्ह्यात कलम वाढ ; पाकिस्तानी ललनेलाही बनविले सहआरोपी
Published on
Updated on

दिनेश गुप्ता/महेंद्र कांबळे : 

पुणे : डीआरडीओ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या झारादास गुप्तालाही आता आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहावे लागणार आहे. तपास करणार्‍या एटीएसच्या अधिकार्‍यांनी तिला आता सहआरोपी म्हणून रेकॉर्डवर घेतले आहे. त्याचबरोबर कुरुलकरविरुध्द आणखी कलम वाढविण्याची विनंती एटीएसकडून करण्यात आली आहे. कारण, ते दोघे मोबाईलवर बोलत असताना तो कॉल युनायटेड किंगडम येथून आल्याचे भासविले जात होते. प्रत्यक्षात मात्र तो कॉल पाकिस्तानी इंटेलिजन्सकडून येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

पुण्यातील दिघी येथील डीआरडीओ विभागात शास्त्रज्ञ म्हणून काम करणार्‍या प्रदीप कुरुलकरने पाकिस्तानी ललनेच्या मदतीने भारतीय बनावटीच्या संरक्षण यंत्राची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली आहे. कुरुलकरचे हे प्रकरण लक्षात आल्यानंतर मागील काही महिन्यांपासून त्याच्यावर तेथील सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून तपास केला गेला. त्याच्या कृत्याचा पर्दाफाश झाल्यानंतर एटीएसकडे त्याच्याविरुध्द तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार 3 मे रोजी त्याला अटक करून त्याच्या ताब्यातील मोबाईल, लॅपटॉप जप्त करून झाडाझडती घेण्यात आली.

तपास यंत्रणा लागली कामाला
कुरुलकरच्या अटकेनंतर त्याच्याजवळून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपचे विश्लेषण करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबकडे ते पाठविण्यात आले. आता तेच लॅपटॉप गुजरातच्या फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. गुजरातच्या लॅबचा अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे. कुरुलकरविरुध्द देखील महत्त्वाचे धागेदोरे एटीएसच्या हाती लागल्याने यामध्ये ऑफिशिअल सिक्रेसी अ‍ॅक्टच्या 1923 च्या कलम 4 नुसार कलमवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी त्याच्यावर शासकीय गुपिते अधिनियम 1923 कलम 03 (1) (क), 05 (1) (अ), (क), (ड) अन्वये गुन्हा दाखल आहे.

कुरुलकर, सरकारी पक्षाचे म्हणणे मागविले
व्हॉइस लेअर व सायकॉलॉजिकल अ‍ॅनालिटिकल टेस्ट आणि पॉलिग्राफ चाचणी करण्यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात आल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात आता कुरुलकरचे म्हणणे मागविले आहे. त्याचबरोबर सरकारी पक्षाला देखील ही टेस्ट महत्त्वाची का आहे? याबाबत म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. कुरुलकरची 26 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी असून, तोपर्यंत त्याचा अहवाल आल्यास तपासाची दिशा बदलू शकते.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news