पुणे : जलतरणपटूंची सुरक्षा रामभरोसे ! प्रशिक्षित प्रशिक्षक आणि लाईफ गार्डचा पत्ताच नाही | पुढारी

पुणे : जलतरणपटूंची सुरक्षा रामभरोसे ! प्रशिक्षित प्रशिक्षक आणि लाईफ गार्डचा पत्ताच नाही

सुनील जगताप : 

पुणे : शहरात महापालिकेबरोबरच खासगी जलतरण तलावांची संख्या अधिक आहे. परंतु, या ठिकाणी येणार्‍या हौशी आणि नवोदित जलतरणपटूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशिक्षित प्रशिक्षक आणि लाईफ गार्ड उपलब्ध नसल्याने जलतरणपटूंची सुरक्षा धोक्यात आली असून, शासनाकडे नियमावलीच नसल्याचे समोर आले आहे.

पुणे शहरात गेल्या काही महिन्यांमध्ये जलतरण तलावात बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडल्या. या घटना घडल्यानंतर संबंधित तलावावर अथवा तलाव चालवणार्‍यांवर काय कारवाई झाली याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे जलतरण तलावावरील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच महापालिका अथवा राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडे जलतरण तलावाबाबत काहीच नियमावली नसल्याचे क्रीडा विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.

निष्काळजीपणा ठरतोय जीवघेणा…
अनेक वेळा शहरातील जलतरण तलावावर मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये अधिक गर्दी झालेली पाहायला मिळते. त्यामध्ये खेळाडूंव्यतिरिक्त हौशी जलतरणपटूंची संख्या अधिक असते. पोहण्यास येत नसतानाही उत्साहीपणे पाण्यात उतरण्याची स्पर्धा लागलेली असते. त्यामध्ये संबंधित जलतरणपटूचा निष्काळजीपणा आणि जीवरक्षक नसणे याचा फटका बसून जिवावर बेतल्याचे आढळून आले आहे.

राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडे जलतरण तलावाबाबत कोणतीच नियमावली नाही. तसेच शासनाकडून कोणत्याही तलावाला लायसन्स दिले जात नाही. त्यामुळे त्यांच्यावर अंकुश ठेवता येत नाही. वास्तविक लायसन्स देऊन स्वतंत्र नियमावली असणे गरजेचे आहे.
                       – महादेव कसगावडे, जिल्हा क्रीडा अधिकारी तथा उपसंचालक 

हे ही वाचा : 

पुणे : तीन कंपन्यांचे खत परवाने निलंबित ; कृषी विभागाची कारवाई

कोरोमंडल एक्स्प्रेसचा चालक कुठे आहे? कुटुंबसुद्धा हतबल

Back to top button